दोघेही क्लासकडे धावताहेत, धावताहेत, धावताहेत, think in slow motion.. आणि त्याच गडबडीत त्या दोघांची एकमेकांशी टक्कर होते.. त्या धक्क्यामुळे तिच्या हातातुन पडलेलं पुस्तक तो तिच्या slow motion मध्ये उडणार्या केसाकडे बघत तिच्या हातात देत असतो.. त्याच्या हाताचा तिला स्पर्श होताच, दोघांनाही एका वेगळ्या उर्जेची जाणीव होते जी आम्ही आधी कधीतरी अनुभवलीय.. नमिता न राहुन सागरला विचारतेय, आपण आधी कधी भेटलोय का.? माहीत नाही पण मलाही तसंच वाटतं आणि फक्त याच कारणामुळे त्यांची मैत्री होते.. मग हळुहळु हीच मैत्री प्रेमात बदलते.. एकमेकांना चोरून भेटणं, भेटवस्तु देणं, तिला फुले आणुन देणं हे तर कायमचंच झालं…